Ahilyanagar: ती घरात येताच अंगावरचे कपडेही काढून टाकले, कीर्तनकाराकडून १७ वर्षीय मुलींवर अनेकवेळा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:32 IST2026-03-17T10:27:11+5:302026-03-17T10:32:18+5:30
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका कीर्तनकार १७ वर्षाच्या मुलीचे पाच वर्षे लैंगिक शोषण केले.

Ahilyanagar: ती घरात येताच अंगावरचे कपडेही काढून टाकले, कीर्तनकाराकडून १७ वर्षीय मुलींवर अनेकवेळा अत्याचार
स्वतःला वारकरी म्हणून घेत कीर्तन करणाऱ्या एका महाराजांच्या काळ्या कृत्यांनी अहिल्यानगर जिल्हा हादरला. एका १७ वर्षाच्या मुलीवर वासनांध नजर पडल्यानंतर या महाराजाने तिचे पाच वर्षे लैंगिक शोषण केले. पारनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. मुलीच्या भावाने तिला विश्वासात घेतल्यानंतर महाराजाची वाईट कृत्ये समोर आली.
यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज असे आरोपीचे नाव आहे. तो श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. मागील पाच वर्षांपासून तो १७ वर्षीय मुलीवर धाक दाखवून अत्याचार करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.
मुलीवर नजर पडली आणि अत्याचाराला सुरूवात झाली
मुलगी इयत्ता आठवीमध्ये असताना अण्णासाहेब गुंजाळ याची पहिल्यांदा तिच्यावर नजर पडली होती. त्यानंतर तिच्या जवळ जाण्याचे प्रयत्न सुरू केले. तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेन अशा धमक्या देत मुलीला भीती घातली आणि त्यानंतर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार आरोपी तिच्यावर अत्याचार करू लागला.
१० मार्च रोजी आरोपी अण्णासाहेब गुंजाळ याने मुलीला घरी बोलावले. तिला मारहाण केली. तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले आणि तिला लोखंडाच्या पकडीने चटके दिले, असा आरोप करण्यात आला आहे.
भावाने विश्वासात घेतले अन् अत्याचाराला वाच्या फुटली
१४ मार्च रोजी मुलीला तिच्या भावाने विचारले. तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने मागील पाच वर्षांपासून अण्णासाहेब गुंजाळ हा अत्याचार करत असल्याचे सांगितले. हा प्रकार समोर आल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
रविवारी (१५ मार्च) रोजी सकाळी पहाटे चार वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.