शिक्षक भारतीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:31+5:302021-09-25T04:20:31+5:30

कुकाणा : नेवासा तालुका शिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी शेषराव आहेर, गोरक्षनाथ शिंदे यांची, तर सचिव म्हणून तुकाराम फटांगरे यांची ...

Aher is the Nevasa taluka vice president of Shikshak Bharati | शिक्षक भारतीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आहेर

शिक्षक भारतीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आहेर

कुकाणा : नेवासा तालुका शिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी शेषराव आहेर, गोरक्षनाथ शिंदे यांची, तर सचिव म्हणून तुकाराम फटांगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ऑनलाईन बैठकीत ही निवड झाली. शिक्षक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या नेतृत्त्वाखालील संघटनेचे जिल्हा कार्यवाह तथा नेवासा तालुकाध्यक्ष संजय भुसारी अध्यक्षस्थानी होते. जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारिणी अशी : मार्गदर्शक - राम कार्जुले, प्राचार्य सोपानराव काळे, नबाब शहा, सुरेश शेरे, उपाध्यक्ष - शेषेराव आहेर, गोरक्षनाथ शिंदे. सचिव - तुकाराम फटांगरे. सहसचिव - सुनील पंडित. कार्यवाह - जयंत पाटील, अर्जुन शिंदे, समन्वयक - नितीन गडाख, नवनाथ साळवे, प्रा. दराडे. खजिनदार - गंगाधर कर्डिले. सहखजिनदार - सागर बनसोडे. प्रसिद्धी प्रमुख - सुनील इंगळे. संघटक - रावसाहेब कर्जुले, संजय काळे. सदस्य - चिंतामणी आहेर, सतीश सुरसे, नानासाहेब घुले, शरद कराड, ईश्वर देशमुख. सिकंदर शेख यांनी सूत्रसंचालन केेेले. प्रा. महेश पाडेकर यांनी आभार मानले.

Web Title: Aher is the Nevasa taluka vice president of Shikshak Bharati