शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

न्यू आर्टस्मध्ये हाणामारी

By admin | Updated: February 27, 2016 23:38 IST

अहमदनगर : शिक्षकांना उलट बोलू नकोस, असे सांगितल्याचा राग आल्याने एका गटाने दोन प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली.

अहमदनगर : शिक्षकांना उलट बोलू नकोस, असे सांगितल्याचा राग आल्याने एका गटाने दोन प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. न्यू आर्टस् महाविद्यालयातील कॅन्टीनसमोर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.दोन राजकीय नेत्यांच्या नावाचे गट कॉलेज आवारात सक्रीय आहेत. त्यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी कॉलेज परिसरात हाणामारी झाली होती. तोच वाद शनिवारी सकाळी पुन्हा उफाळला. एका राजकीय नेत्याचे एकेरी नाव घेतल्याने दुसऱ्या गटाने विठ्ठल महादेव कोतकर (रा. केडगाव देवी) याला जबर मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला. यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या महाविद्यालय शिस्तपालन समितीच्या दोन प्राध्यापकांनाही मारहाण करण्यात आली. बराचवेळ हा गदारोळ सुरू होता. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे त्यांच्या पथकासह दाखल होण्यापूर्वीच हाणामारी करणारे सर्वच पळून गेले. पोलीस उपअधिक्षक बजरंग बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देवून कॉलेज व्यवस्थापनाला सूचना केल्या. या मारहाणीत जखमी झालेला विठ्ठल महादेव कोतकर याने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभि भिंगारदिवे आणि इतर तीन जणांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान हाणामारी करणाऱ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी याआधीच कॉलेज व्यवस्थापनाकडे गैरवर्तन केल्याबद्दल माफीनामा दिलेला आहे. असे असतानाही शनिवारी पुन्हा त्याच विद्यार्थ्यांनी हाणामारी केली आहे.कॉलेजच्या आवारात ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. कॉलेजला एकच प्रवेशद्वार असावे. कॉलेजमध्ये येऊन पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणे, हे दुर्दैव आहे. गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांवर प्राचार्यांनी कारवाई करावी. प्राचार्यांनी कारवाई न केल्यास पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल.-बजरंग बनसोडे,पोलीस उपअधीक्षक