शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या कारला अपघात; दोघे ठार, मुलाचे अपहरण करून करत होते पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 09:58 IST

Accident News: मायंबा-सावरगाव मार्गावर एका शाळकरी मुलाचे अपहरण करत त्याच्याकडील सोने ओरबाडून कारमधून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला.

तिसगाव (अहमदनगर) : मायंबा-सावरगाव मार्गावर एका शाळकरी मुलाचे अपहरण करत त्याच्याकडील सोने ओरबाडून कारमधून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला. त्यांनी मुलाला मध्येच उतरवले. पण तरीही ग्रामस्थांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने या कारने तिसगाव (ता. पाथर्डी) बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एका कारसह एका पादचाऱ्याला उडविले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.अपघाताची वाहने बराच काळ महामार्गावरच पडून राहिली. त्यामुळे तिसगावातील तिहेरी मार्गावर एक किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने दीड तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. गंगाधर बुधवंत, रमेश नरवडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तिघा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी मायंबा-सावरगाव रस्त्यावर शेताकडे जात असलेल्या चैतन्य भगत यास अडवून कारमध्ये घेतले व चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण केली. गळ्यातील सोने, मोबाईल हिसकावले. ही घटना सावरगाव येथे समजताच ग्रामस्थांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांनी चैतन्यला वृद्धेश्वर घाटात सोडून दिले. घाटशिरसहून ही कार श्री क्षेत्र मढीमार्गे तिसगावकडे भरधाव आली. तिसगाव बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एका कारसह एका पादचाऱ्याला कारने जोराची धडक दिली. त्यानंतर अपहरण करणाऱ्यांची कार एका दुकानाला आदळून बंद पडली. त्यानंतर कारमधील तिघे जण पळून गेले. धडक बसलेल्यांमधील गंगाधर बुधवंत व रमेश नरवडे यांचा मृत्यू झाला, तर बाळू केदार, सचिन घोरपडे, प्रा. प्रकाश लवांडे हे तिघे जखमी झाले. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करीत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात