अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:42+5:302021-02-05T06:28:42+5:30
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना २४ जानेवारीला सायंकाळी ४ वाजण्यादरम्यान घडली. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मंगळवारी (२ फेब्रुवारी) लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. जालिंदर तुळशीराम वांगे (वय ३३, रा.राऊतवस्ती, निर्मळ पिंप्री ता.राहाता) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २४ जानेवारी या दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. लोणी पोलीस ठाण्याच्या फिर्याद दिली असून पोलिसांनी जालिंदर तुळशीराम वांगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास समाधान पाटील करत आहेत.