भावीनिमगावच्या सरपंचपदी आबासाहेब काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:14+5:302021-02-12T04:20:14+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आबासाहेब काळे तर उपसरपंचपदी संतोष चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदासाठी निलेश ...

Abasaheb Kale as the Sarpanch of Bhavinimgaon | भावीनिमगावच्या सरपंचपदी आबासाहेब काळे

भावीनिमगावच्या सरपंचपदी आबासाहेब काळे

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आबासाहेब काळे तर उपसरपंचपदी संतोष चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदासाठी निलेश कुंभकर्ण आणि आबासाहेब काळे यांचे उमेदवारी अर्ज होते. अर्ज मागे घेण्याची वेळ संपण्याच्या दोन मिनिट अगोदर निलेश कुंभकर्ण यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सरपंचपदी आबासाहेब काळे यांची निवड झाली. उपसरपंचपदासाठी संतोष चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत पालवे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी यांनी सहकार्य केले. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब ताके यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद माधवराव कुलकर्णी, माजी सभापती त्रिंबक जाधव, संतोष आडकित्ते, दिलीप मरकड, कचरू शेळके, श्रीकृष्ण काळे, सदाशिव जाधव, दत्तात्रय जरे, सुहास गायधने आदी उपस्थित होते.

Web Title: Abasaheb Kale as the Sarpanch of Bhavinimgaon