कर्जत नगरपंचायतीच्या मतदार यादीवर ८९५ हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:11+5:302021-02-23T04:33:11+5:30

कर्जत : नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (साेमवार) ८९५ हरकती प्रशासनाकडे मिळाल्या आहेत. नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या ...

895 objections on Karjat Nagar Panchayat voter list | कर्जत नगरपंचायतीच्या मतदार यादीवर ८९५ हरकती

कर्जत नगरपंचायतीच्या मतदार यादीवर ८९५ हरकती

कर्जत : नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (साेमवार) ८९५ हरकती प्रशासनाकडे मिळाल्या आहेत.

नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. यादी बनविण्यासाठी नगर पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. दोन टीम करून आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ज्या मतदारांचा सर्वसामान्य रहिवास ज्या प्रभागात आहे, तो मतदार त्याच प्रभागात ठेवणे, एखाद्या प्रभागाच्या हद्दीतील किंवा नगरपंचायतीच्या हद्दीतील कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, तसेच नगर पंचायतीच्या हद्दीबाहेरील व्यक्तीचा प्रारूप मतदार यादीत समाविस्ट होणार नाहीत, याची दक्षता घेऊन प्रारूप मतदार याद्या बनविण्यात आल्या. हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ८९५ हरकती दाखल झाल्याचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

आलेल्या हरकतींवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे या निर्णय घेणार असून, अंतिम मतदार यादी १ मार्च रोजी जाहीर करणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर साडेचार हजार हरकती आल्या होत्या. त्यावरून मोठा गोंधळ झाला होता. अनेकांनी त्यावेळी प्रशासनाला धारेवर धरले होते.

Web Title: 895 objections on Karjat Nagar Panchayat voter list