शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

७१८ जणांना कावीळ

By admin | Updated: February 18, 2023 10:50 IST

अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले

अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले असून, काविळीच्या रुग्णांची संख्या गुरुवारी ७१८ वर पोहोचली आहे़ त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठा होत होता़ परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच होता़ हे पाणी पिल्याने परिसरातील नागरिकांना कावीळ रोगाची लागण झाली़ सुरुवातीला ही संख्या कमी होती़ मात्र काही दिवसांतच ती वाढली़ परिसरातील नगरसेवकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या़ फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून, घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आणखी २० जणांना कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे काविळीच्या रुग्णांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे़ तसेच बालिकाश्रम रस्ता परिसरातही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून गुरुवारी करण्यात आली़ या तक्रारीची दखल घेऊन उपायुक्त बेहरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली़ दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे कावीळ रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे़ दिवसेंदिवस काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, उपाय योजनाही हाती घेण्यात आल्या आहेत़ मात्र काविळीवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश येत आहे़घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ पिण्याचे पाणी तपासणे, हॉटेलमधील कामगारांचे आरोग्य तपासणी करणे, साथ रोग असल्यास रूग्णांवर जागेवरच उपचार करणे,यासारख्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी गळतीची शोध मोहीम हाती घेतली आहे़तक्रार प्राप्त झाल्यास परिसराची पाहणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़