सलाबतपूरच्या शिबिराचा ७१२ जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:18+5:302021-09-24T04:25:18+5:30

नेवासा : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सलाबतपूर (ता. नेवासा) येथे शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने युवा सेनेचे तालुका प्रमुख संदीप शेळके यांच्या ...

712 people took advantage of the Salabatpur camp | सलाबतपूरच्या शिबिराचा ७१२ जणांनी घेतला लाभ

सलाबतपूरच्या शिबिराचा ७१२ जणांनी घेतला लाभ

नेवासा : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सलाबतपूर (ता. नेवासा) येथे शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने युवा सेनेचे तालुका प्रमुख संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचा ७१२ जणांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मच्छिन्द्र महाराज निकम होते. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, माजी सरपंच नीलेश शेळके, गोगलगावचे दिलीप मते, डॉ. सलीम शेख, युवा सेनेचे शुभम उगले, पत्रकार सुनील गर्जे, वैद्यकीय अधिकारी अमोल चिंधे आदी उपस्थित होते. कोरोना संसर्ग काळात आरोग्याविषयी जनजागृती व ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन हे नागरिकांना दिलासा देणारे असून, मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाचा हा लोकहिताचा उपक्रम स्तुत्य आहे, असे कांगुणे म्हणाले.

यावेळी संजय देशमुख, रवींद्र निकम, राजेंद्र देशमुख, शंकर वाघ, केशव गणगे, राउफ शेख, दीपक मते, स्वप्नील मते, सोमनाथ शेळके, शुभम उगले, पप्पू गिऱ्हे, असिफ पटेल, साहिल परदेशी, रिजवान कादरी, अजहर शेख, गोकुळ लोंढे, मुन्ना चक्रनारायण, महेश औताडे, सुभाष शेळके, अशोक शेळके, बबनराव शेळके, प्रल्हाद मते, सीताराम मते, हनीफ शेख, दत्तात्रय शेळके, अल्पेश बोरकर, अक्षय शेळके, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: 712 people took advantage of the Salabatpur camp