माध्यमिक शिक्षक संघाकडून कोविड सेंटरला ५० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:48+5:302021-08-27T04:24:48+5:30

कोपरगाव : कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने एक हात मदतीचा या संकल्पनेतून एक लाखांचा निधी जमा केला होता. ...

50,000 from Secondary Teachers Association to Kovid Center | माध्यमिक शिक्षक संघाकडून कोविड सेंटरला ५० हजारांची मदत

माध्यमिक शिक्षक संघाकडून कोविड सेंटरला ५० हजारांची मदत

कोपरगाव : कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने एक हात मदतीचा या संकल्पनेतून एक लाखांचा निधी जमा केला होता. या निधीतून ५० हजारांच्या मदतीचा धनादेश कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला संघटनेच्या वतीने नुकताच देण्यात आला.

यावेळी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेवराव सोनवणे, शंकर जोर्वेकर, सुरेश बोळीज, गजानन शेटे, कर्णासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष विलास वाकचौरे, सचिव नरेंद्र ठाकरे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड, अरुण बोरनारे, तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ, भास्कर काजळे, भाऊसाहेब माने, मनोहर म्हैसमाळे, रमेश मोरे, दीपक भोये, उमेश पवार, अतुल कोताडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी तर आभार नरेंद्र ठाकरे यांनी मानले.

Web Title: 50,000 from Secondary Teachers Association to Kovid Center