उस्वाल इम्पीरियल चव्हाण (रा. वाळूंज, पारगाव, ता. अहमदनगर), जीरीप भगवान भोसले (अरणगाव रस्ता, अहमदनगर) व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरोधात टकाजी रामभाऊ खेमनर (चिंचेवाडी, साकूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामाभाऊ खेमनर हे त्यांचा मुलगा टकाजी खेमनर यांच्यासमेवत साकूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. टकाजी खेमनर पैसे काढत असताना त्यांचे वडील बँकेत बसलेले असताना त्यांच्या खिशातून चोरट्यांनी १५ हजार रूपये चोरले. त्यानंतर चोरटे तेथून निघून गेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर टकाजी खेमनर हे चोरट्यांचा शोध घेत असताना सेंट्रल बँकेत आलेले तिघे जण त्यांना जिल्हा बॅँकेच्या शाखेत दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ग्रामस्थांच्या सह्याने पकडण्यात आले. यातील एक जण पळून गेला. पकडलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉस्टेबल दशरथ वायाळ करीत आहेत.