शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग 1

By admin | Updated: August 12, 2016 14:55 IST

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की

- सदगुरू श्री वामनराव पै
 
आपण सर्व सुखी होवूया.
सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते हयाऐवजी वामनराव चुकीने उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यत जे काही वाचत आलो, ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती? जवाएवढे व दु:ख किती? पर्वताएवढे, पण जीवनविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय केले पाहिजे हे महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कुणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा हेतू आहे. एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परममुर्ख“.  “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही म्हटलेले आहे. कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण. तुम्ही म्हणाल वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे. आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्वर कॄपाही करत नाही व कोपही करत नाही. तुमच्या जीवनविद्येत सगळेच आगळे वेगळे कसे? जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे ते तुम्ही समजावून घ्यावे, ते तुम्ही आचरणांत आणावे व तुम्ही सुखी व्हावे किंबहूना तुम्ही आम्ही सगळेच सुखी व्हावेत अशी जीवनविद्येची संकल्पना आहे. जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होवूया. काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही. आपण सर्व सुखी होवूया ही जीवनविद्येची भावना आहे, धारणा आहे. जीवनविद्येची ही धारणा लक्षांत घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतलेत तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व, महात्म्य कळून चुकेल. प्रश्न असा निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे तुम्ही सांगता हे कसे काय कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण. बरे हा अनुभव आमचाच आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर आजतागायत हाच अनुभव आहे.
क्रमश: