Jiselle Arianne, Russia Ukraine War: "हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट Vladimir Putin यांनाच दिलं 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:50 PM2022-03-29T20:50:12+5:302022-03-29T21:05:02+5:30

रशिया युक्रेन युद्धावरून अजूनही जागतिक वातावरण तापलेलंच आहे.

Vladimir Putin Jiselle Arianne, Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. जवळपास महिन्याभरापासून हे युद्ध अखंड सुरूच आहे. या युद्धामुळे जग दोन गटांत विभागलं गेलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अमेरिका, ब्रिटन यांसारखे देश सध्या रशियाच्या विरोधात उभे आहेत. तर सीरिया, चीन यांसारख्या देशांनी रशियाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची महत्त्वाकांक्षा वाढतच आहे.

यादरम्यान एका सुंदर तरूणीने पुतीन यांना थेट बॉक्सिंग रिंगमध्ये भिडण्याचं आव्हान दिलं आहे.

बॉक्सिंग रिंग गर्ल जिसल एरियन ( Jiselle Arianne ) हिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बॉक्सिंग रिंगमध्ये लढण्याचे आव्हान दिले आहे.

६९ वर्षीय पुतीन यांना रिंगमध्ये आक्रमक प्रत्युत्तर देण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

फ्लोरिडामधील ऑरलँडो शहरात बाली स्पोर्ट्समध्ये खेळणाआधी एरियन म्हणाली, "हिंमत असेल तर पुतीन यांनी माझ्याशी बॉक्सिंग रिंममध्ये खेळावं."

"पुतीन माझ्याविरोधात बॉक्सिंग रिंग मध्ये खेळण्यास तयार झाले तर खूप बरं होईल. मला युद्धाचा निषेध करता येईल. मी पुतिनविरुद्ध रिंगमध्ये आक्रमकपणे खेळेन." असंही ती म्हणाली.

एरियनने आव्हान दिलेल्या पुतिन यांच्याकडे तायक्वांडोमधील मानद ब्लॅक बेल्ट होता. पण जागतिक तायक्वांडो महासंघाने गेल्या महिन्यात रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत तो सन्मान रद्द केला.

पुतीन यांना तायक्वांडो, मार्शल आर्ट्सची अशा खेळांची चांगली माहिती आहे. तरीदेखील एरियनने त्यांना आव्हान देण्याचं धाडस केलं आहे. (सर्व फोटो - Instagram)