मुलीच्या ट्रेनिंगसाठी कर्ज काढलं, ३ वर्ष सुट्टी घेतली; आज त्याच पोरीनं सुवर्णपदक कमावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:17 PM2022-08-07T19:17:40+5:302022-08-07T19:23:24+5:30

भारताची युवा स्टार नितू घनघस हिने राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. नितूनं इंग्लंडच्या डेमी जेडला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. नितूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. रिंगमध्ये नितूच्या मेहनतीनं तिला पदक मिळवून दिलं असले तरी तिला रिंगमध्ये आणण्याचं श्रेय तिच्या वडिलांना जातं. (पीटीआय)

भारताची युवा स्टार नितू घनघास हिने राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. नितूनं इंग्लंडच्या डेमी जेडला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. नितूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. रिंगमध्ये नितूच्या मेहनतीनं तिला पदक मिळवून दिलं असले तरी तिला रिंगमध्ये आणण्याचं श्रेय तिच्या वडिलांना जातं. (पीटीआय)

नितू भिवानी येथील रहिवासी आहे. विजेंदर सिंह को देखकर बॉक्सर बनण्याचं स्वप्न तिनं पाहिलं. 2012 साली तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण सुरुवात चांगली झाली नाही. ती राज्य पातळीवर ३ वर्ष चांगली कामगिरी करू शकली नाही. पण वडिलांनी हार मानली नाही आणि तिला वेळोवेळी प्रोत्साहन देत आले. (NITU Instagram)

खेळाचा खर्च उचलण्यासाठी नितूचे वडील धडपडत होते. गेल्या चार वर्षांपासून ते रजेवर असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ते पूर्णपणे मुलीसोबत वेळ द्यावा लागत असल्यानं त्यांना नोकरीला जाणं शक्य नव्हतं. पैशांची कमतरताही होती. वडिलांनी आपल्या मुलीच्या ट्रेनिंगसाठी मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली कारही विकावी लागली होती. आपल्या मुलीच्या प्रशिक्षणात कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. (NITU Instagram)

नीतूसाठीही आजवरचा प्रवास सोपा नव्हता. 2015 मध्ये एका अपघातामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. यादरम्यान तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. याही काळात तिचे वडील तिच्यासोबत ठामपणे उभे होते. 2019 मध्ये, ती पुन्हा जखमी झाली, ज्यामुळे ती पुन्हा रिंगपासून दूर गेली. नितू कोरोनाच्या काळात शेतात सराव करायची. (पीटीआय)

नीतूला 2016 मध्ये तिच्या करिअरमध्ये पहिलं मोठं यश मिळालं होतं. नीतूनं ग्वाल्हेर येथे झालेल्या शालेय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याच वर्षी, ती गुवाहाटी येथे जागतिक युवा चॅम्पियन बनली. त्याचबरोबर आशियाई युवा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलं. 2021 मध्ये, ती वरिष्ठ संघात परतली आणि त्याच वर्षी स्ट्रांझा मेमोरियलमध्ये पदक जिंकलं. आता नितू कॉमनवेल्थ चॅम्पियन बनली आहे.