शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील मालमत्तांचे ड्रोन सर्वेक्षण

By admin | Updated: December 23, 2016 02:17 IST

शहराच्या हद्दवाढीनंतर आता नव्याने मालमत्तांचे मूल्याकंन केले जात आहे. त्यासाठी अमरावती येथील

कर आकारणी : विवरण पत्रावर घराच्या छायाचित्रासह क्षेत्रफळ
सुरेंद्र राऊत  यवतमाळ
शहराच्या हद्दवाढीनंतर आता नव्याने मालमत्तांचे मूल्याकंन केले जात आहे. त्यासाठी अमरावती येथील संस्थेला ड्रोन कॅमेरांव्दारे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. या कॅमेऱ्यांनी काही भागातील घरांचे छायाचित्र घेतले आहे. आता नवीन कर आकारणीत मालमत्ताधारकांना विवरण पत्र दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक करदात्याचे स्वतंत्र प्रॉपर्टी टॅक्स कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे.
नगरपरिषद क्षेत्रात आजमितीस केवळ २६ हजार मामत्तांचेच विवरण उपलब्ध आहे. शहराची हद्दवाढ झाल्यानंतरही तब्बल वर्षभर ग्रामपंचायतीच्या दरातच सबंंधित मालमत्ताधारकांना कर आकारणी करण्यात आली होती. त्यामुळे आता या भागाचे नव्याने सर्व्हेक्षण करून कर आकारणीसाठी मालमत्तांचे क्षेत्रफळ, तिचा वापर, यावरून कर आकारणी केली जाणार आहे. या सर्व मालमत्तांचे छायाचित्रासह क्षेत्रफळाचे विवरण गोळा केले जात आहे. यामुळे कर आकारणी कशी करण्यात आली, हे सर्वसामान्य नागरिकांना पावती पहाता क्षणीच निदर्शनास येणार आहे.
शहरातील बहुतांश मालमत्तांची ‘गुगल इमेज’ अस्पष्ट असल्याने आता स्वतंत्र ड्रोन कॅमेराचा वापर करून ११ विभागातील मालमत्तांचे छायाचित्रण केले जाणार आहे. यातून शहराचे एक सलग छायाचित्र तयार करण्यात येणार आहे. त्याचा सर्वच प्रशासकीय कामासाठी वापर करता येणार आहे. विकासाची योजना, एखादा समस्येचे निराकरण करण्यासाठी या ड्रोन इमेज मॅपची मदत होणार आहे. शिवाय ड्रोन कॅमेराने टिपलेल्या छायाचित्रातील मालमत्तांना टॅगिंंग केले जाणार आहे. त्यामुळे करचोरी करणे शक्य होणार नाही. अनेक करदात्यांचे प्रत्यक्षातील बांधकाम आणि कर आकारणीसाठी दाखविल्या जाणाऱ्या बांधकामात मोठी तफावत असते. कर चोरी करण्यासाठी मुद्दाम घराचे क्षेत्रफळ कमी दाखविण्याचा खटाटोप केला जातो. अनेकदा सर्व्हेक्षणासाठी गेलेल्या पथकाशी मालमत्ताधारक ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून कर कमी करण्याचे प्रयत्न करतात. आता हा फंडासुध्दा कुचकामी ठरणार आहे. ड्रोनद्वारे इमेज काढल्यानंतर टँगींग करताना त्या मालमत्तेचे क्षेत्रफळी नमूद केले जाणार आहे. त्यामुळे आॅफीसमध्ये बसल्याबसल्या क्षेत्रफळाबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करता येणार आहे.

ग्रामीण, शहरी मालमत्तेचा भेद संपुष्टात
शहरात मागील महिनाभरापासून स्थापत्य संस्था मालमत्ता सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे. नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर लगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश नगरपरिषदेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामीण व शहरी मालमत्ता असा भेद राहणार नाही. संपूर्ण शहरात एकाच निकषाने कर आकारणी केली जाणार आहे. मात्र त्याचा फटका पूर्वीच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ताधारकांना बसणार आहे.