शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्रीय खो-खो स्पर्धेत यवतमाळ संघाला सुवर्ण

By admin | Updated: August 22, 2015 02:39 IST

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयातील ....

तीन राज्यांचा सहभाग : केंद्रीय विद्यालयाने मारली बाजी, चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर झेपयवतमाळ : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयातील १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने केंद्रीय विद्यालय मध्यप्रदेश संघाचा पराभव करून प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली. १७ ते १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील ५४ केंद्रीय विद्यालयातील खेळाडुंनी सहभाग घेतला होता. यवतमाळच्या संघाने नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व केले. १४ वर्षा आतील खो-खो स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवित थेट अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत यजमान मध्यप्रदेशच्या पन्ना संघाचा एकतर्फी पराभव केला. विजयी संघात साहिल शंभरकर (कर्णधार), अर्थव भाटी, सुहास घोडाम, मयुर गजभिये, मंदार ढाले, तेजल कुमरे, हर्षीद सिडाम, प्रथमेश गावंडे, देवांशु भुरे, तेजस पेटे, राज पांढरकर, चिराग वानखडे या खेळाडुंचा समावेश होता. संघासोबत मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक अशोक गुल्हाने व व्यवस्थापक म्हणून शैलेंद्र पचघारे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या साहिल शंभरकर, देवांशु भुरे, तेजस पेटे व सुहास घोडाम या खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हे खेळाडु ३१ आॅक्टोबरपासून दिल्ली येथे आयोजित स्पर्धेत सहभागी होतील. केंद्रीय विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह व प्राचार्य पी.व्ही.एस.एस.एस. कृष्णा यांनी विजयी संघाचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)