शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगल वार्‍यावर

By admin | Updated: May 25, 2014 23:55 IST

यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्त तीन जिल्ह्यांमध्ये व्यापले आहे. येथील जंगलांमध्ये मौल्यवान सागवान, वन्यप्राणी आणि विपूल वन औषधी आहे. मात्र वन रक्षकांअभावी त्यांची सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. एकेका वनवतरुळात चार ते पाच वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचारी हजार हेक्टरवरील जंगलांची सुरक्षा करू शकत नाही. त्यामुळे वनसंपदेच्या तस्करीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी यवतमाळ वनवृत्तात चार वन विभाग होते. त्यामध्ये यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, अकोला आदींचा समावेश होता. एकेका वनवतरुळात हजारो हेक्टर वनक्षेत्र येत होते. त्यामुळे वनसंरक्षणाचा ताण कर्मचार्‍यांवर येत होता. ही बाब गांभीर्याने घेत वन खात्याने येथील वनक्षेत्राचे फेर सीमांकन केले. त्यामध्ये यवतमाळ वनवतरुळात नव्याने वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती झाली. अनेक वनपरिक्षेत्रांची हद्द कमी करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वनपरिक्षेत्रात जोडण्यात आली. वन वतरुळाचे फेर सीमांकन झाल्यानंतर तेथे अतिरिक्त कर्मचार्‍यांचा भरणा करणे गरजेचे होते. मात्र या संदर्भात वन विभागाने कुठलीही पाऊले उचलली नाही. त्यामुळे वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होण्यापेक्षा तो उत्तरोत्तर वाढताच आहे. एकेका वनवतरुळात पाच ते सहा वनरक्षकांची पदे रिक्त असल्याने हजारो हेक्टर वनक्षेत्र वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे.

नेमक्या याच बाबीचा फायदा घेत अनेक वन तस्कर सक्रिय झाले आहे. नव्याने झालेल्या वडगाव (जंगल), पूर्वाश्रमीच्या घाटंजी, आर्णी, हिवरी या वन परिक्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल केली जात आहे. ही कत्तल रोखण्यासाठी जंगलात रात्र गस्त होणे गरजेचे आहे. मात्र नियमित गस्त होत नसल्याने आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सागवान तस्करीत वाढ होत आहे. या तस्करीची अनेक उदाहरणे संबंधित वन परिक्षेत्रात उघडकीस आली आहे. या संदर्भात काही वनरक्षकांना खासगीत विचारणा केली असता त्यांनी दोन-दोन बीटमध्ये काम करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

हजारो हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण एकटा वनरक्षक करू शकत नाही. त्यामुळेच वनसंपदेच्या तस्करीत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. वन विभागाला याची जाणिव असल्याने वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या बाबतीत जबाबदार धरल्या जात नाही. या उलट कारवाई कशी शिथील करता येईल, याचा वरिष्ठांकडून प्रयत्न केला जातो. त्यामुळे अडचणींचा सामना करून वन संरक्षणाचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

(स्थानिक प्रतिनिधी)