शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती दंगलीत सुनील सेवतकर अव्वल

By admin | Updated: January 5, 2017 00:16 IST

नववर्षानिमित्त पूस नदीतीरावर आयोजित कुस्तीच्या दंगलीत सोलापूरचा पहेलवान सुनील सेवतकर याने प्रथम क्रमांक पटकावला,

पुसद : नववर्षानिमित्त पूस नदीतीरावर आयोजित कुस्तीच्या दंगलीत सोलापूरचा पहेलवान सुनील सेवतकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सोलापूरचाच रवी शेनगे द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला. कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पूस नदीतीरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या कुस्ती दंगलीचे उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मणराव जाधव, पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, बाजार समिती सभापती दिलीप बेडे, ठाणेदार वाघू खिल्लारे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाळे, निशांत बयास, कालू पहेलवान, राहुल कांबळे उपस्थित होते. सोलापूरचा सुनील सेवतकर याची लढत दिल्लीचा पवनकुमार याच्यासोबत झाली. रोमहर्षक लढतीत सेवतकर प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला.
आखाड्यात ५० च्यावर पहेलवान उतरले होते. त्यात सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, पांढरकवडा, परभणी, नांदेड, दिल्ली, हिंगोली, राहटी, बिजराणी, पळसगाव, पुसद येथील पहेलवानांचा समावेश होता. पहिल्या पाच पहेलवानांना बाबाराव लेव्हेकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ट्रॉफी देण्यात आली. परमेश्वरभैया, राजू दुधे, अभिजित चिद्दरवार, बिपीन चिद्दरवार, सज्जन आडे यांच्याकडून पुरस्कार देण्यात आले. पंच म्हणून कालू पहेलवान, नंदू चौधरी, गणेश भिसे, मनोज पवार, दिनेश ठाकूर, विष्णू पहेलवान, गणेश पहेलवान, विश्वास पहेलवान, खोब्राजी कांबळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी किशोर पानपट्टे, विशाल कांबळे, मंगेश करण, विष्णू गुद्धटवार, अमोल साखरे, अविनाश कदम, खेमानंद महल्ले, राजू मोराई, नटवर उंटवाल, राहुल सहारे, अभिमन्यू शिंदे, सचिन गायकवाड यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)