भूमिअभिलेखमधील कामाचा झाला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:20+5:30

आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

Work on land records was delayed | भूमिअभिलेखमधील कामाचा झाला खोळंबा

भूमिअभिलेखमधील कामाचा झाला खोळंबा

Next
ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष क मारेगावात घ्यावे लागतात नागरिकांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील ५० टक्केपेक्षा जास्त्त पदे रिक्त असल्याने या कार्यालयात अनेक मोजणी व एकत्रिकरण प्रकरणे खोळंबली आहे.
आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मुख्य फेरफारसाठी असलेले पद रिक्त आहे, तर तिसरे महत्वाचे पद निमतनदार हेसुध्दा रिक्त असल्याने तब्बल १८२ मोजणी प्रकरणे, तर एकत्रिकरणाची ४० प्रकरणे अनेक दिवसांपासून खोळंबली आहे. मारेगाव भूमिअभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांकडे मारेगावसह वणीच्या भूमिअभिलेख कार्यालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दोन तालुक्याचा भार सांभाळताणा तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकुणच भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराने विशेषतः शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. साधा शेतीचा नकाशा पाहीजे असल्यास शेतकऱ्यांना बरेचदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे जनता त्रस्त आहे. वेळेनंतर येणे आणि वेळेपुर्वी गायब होणे, हा येथील कर्मचाऱ्यांचा फंडा आहे.
या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतीची कामे सोडून येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. कधी कर्मचारीच राहत नसल्याने त्यांचा शेतकऱ्यांचा पूर्ण दिवस या कार्यालयातच जातो.

Web Title: Work on land records was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार