शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला वनपालास पाच हजारांची लाच घेताना अटक

By admin | Updated: October 8, 2014 23:32 IST

सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील

पांढरकवडा येथे कारवाई : सागवानाचा पंचनामा अहवालासाठी मागणीपांढरकवडा : सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील राणीलक्ष्मीबाई वार्डात बुधवारी दुपारी करण्यात आली. रिना गुलाबराव पाटील असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या महिला वनपालाचे नाव आहे. ती उमरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रादेशिक) येथे कार्यरत आहे. खरेदी केलेल्या सागवानाच्या झाडांचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारकर्त्याला पाच हजारांची मागणी केली. त्यावरून संबंधिताने तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. बुधवारी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारकर्त्याने वनपाल रिना पाटील यांना त्यांच्या राहत्या घरीच पाच हजाराची लाच दिली. पंचाचा इशारा मिळताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच लाचेची रक्कम जप्त केली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख, कर्मचारी अमोल महल्ले, नयन लेवरकर, नीलेश पखाले, अनिल जोशी, शैलेश ढोले, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड आदींनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)