फुलसावंगीत पतीपाठोपाठ पत्नीनेही जीवनयात्रा संपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:09+5:30

फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही.

The wife ended her life-long journey with a flower husband | फुलसावंगीत पतीपाठोपाठ पत्नीनेही जीवनयात्रा संपविली

फुलसावंगीत पतीपाठोपाठ पत्नीनेही जीवनयात्रा संपविली

ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : ऐन दसऱ्याच्या दिवशी शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : पतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची वार्ता कळताच पत्नीनेही गळफास लावून जीवन यात्रा संपविली. ही घटना फुलसावंगी येथे मंगळवारी ऐन दसºयाच्या दिवशी घडली.
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. त्यांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र फकीरा कुठेही आढळला नाही. मंगळवारी सकाळी गावातील सार्वजनिक विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची वार्ता पसरली. फकीराच्या आईने विहिरीवर जाऊन बघितल्यानंतर तो मृतदेह फकीराचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच फकीराची पत्नी नीलाबाई हिने विरहाच्या कल्पनेने राहत्या घरी गळफास लावला. यात नीलाबाईचा मृत्यू झाला.
ऐन दसऱ्याच्या दिवशी गावात दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. मृत फकीराच्या वृद्ध आईवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महागावला रवाना करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी दोघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The wife ended her life-long journey with a flower husband

टॅग्स :Deathमृत्यू