शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का हो !

By admin | Updated: September 11, 2014 23:50 IST

दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का फौजदार अशी विचारणा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सेवा ज्येष्ठ जमादारांना केली जात आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी डोक्यावर पी-कॅप घालण्यास

यवतमाळ : दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का फौजदार अशी विचारणा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सेवा ज्येष्ठ जमादारांना केली जात आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी डोक्यावर पी-कॅप घालण्यास फारसे कुणी इन्टरेस्टेड नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षकाच्या दीड हजारांवर जागा रिक्त आहेत. समोर सण-उत्सव, विधानसभा निवडणुका असल्याने आत्ताच या जागा भरणे शक्य नाही म्हणून शासनाने यावर तात्पुरत्या व स्थानिक नियुक्त्यांचा तोडगा काढला आहे. पोलीस दलात सेवा ज्येष्ठ असलेल्या सहायक उपनिरीक्षक व जमादारांना पुढील दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आहे त्याच जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. रिक्त पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे. विशेष असे संबंधिताला या पदाची वेतनवाढ अथवा कोणतेही सेवा विषयक लाभ मिळणार नाहीत. अर्थात वेतन जमादाराचे आणि काम फौजदाराचे अशी ही नियुक्ती राहणार आहे. ही दोन महिन्यांसाठीची पदोन्नती स्वीकारण्यास तयार असलेल्या एएसआय, जमादारांना लेखी संमतीपत्र फॅक्सद्वारे तातडीने मागण्यात आले आहे. जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसद्वारे हा संदेश पास झाला असला तरी औटघटकेसाठी फौजदार होण्यास फारसे कुणी उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. फौजदार पदासाठी यापूर्वी खात्यांतर्गत परीक्षा घेतली गेली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र त्यावेळी गुणांऐवजी सेवा ज्येष्ठता हा निकष लावला गेल्याने अनेक हुशार पोलीस कर्मचारी फौजदाराच्या या स्पर्धेतून बाद ठरले आहे. या पदासाठी प्रतीक्षा यादी लावली गेली असली तरी आतापर्यंत त्यातून रिक्त पदे भरली गेली नाही. निवडणुकीपर्यंत ही प्रतीक्षा यादी एक वर्षाच्या निकषानुसार बाद ठरणार असल्याने या यादीची मुदत किमान तीन वर्ष केली जावी, अशीही मागणी आहे. यापूर्वी परिक्षेत्र आणि आयुक्तालय स्तरावर ११ महिन्यांसाठी फौजदारकी देण्याची पद्धत रुढ झाली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी फौजदारकी हा फंडा रुचलेला नाही. त्यामुळेच कित्येकांनी या तात्पुरत्या फौजदारकीकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)