शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

वणी बस आगाराला स्वच्छतेचा विटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात । प्रसाधनगृह दुर्लक्षीत, विश्रामगृहाला झुडूपांचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : देशभरात स्वच्छ भारतचा नारा दिला जात असताना दुसरीकडे वणी आगाराने मात्र स्वच्छतेच्या विषयात विटाळ पाळला आहे. आगारात कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था बकाल झाली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. विश्रामगृहदेखील दुर्लक्षित असून या परिसरात झुडूपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे. या विश्रामगृहात मुक्कामाने थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. झोपण्यासाठीदेखील आवश्यक ती व्यवस्था याठिकाणी नाही. उन्हाळ्यात तर येथे कुलर किंवा थंड पाणीदेखील मिळत नाही. सन २००० मध्ये या विश्रामगृहाला लागूनच प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र प्रसाधनगृहाची प्रचंड तुटफूट झाली असून त्यामुळे याठिकाणी कायम घाणीचे साम्राज्य असते. प्रसाधनगृहात जाणाºया कर्मचाºयांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.आगार व्यवस्थापक कार्यालयासमोरदेखील प्रसाधनगृह असून त्याची अवस्थादेखील बिकट झाली आहे. प्रसाधनगृह वापरण्यालायक नसल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावरच नैसर्गीक विधी उरकावा लागत आहे. विशेष म्हणजे याच आगार परिसरातून केंद्र सरकारच्या स्वच्छता विषयक योजनेचा अनेकदा गवगवा केला जातो. परंतु खुद्द वणी आगाराच घाणीच्या विळख्यात सापडला आहे. आगार परिसर स्वच्छ राहावा, यासाठी एका कंपनीला कंत्राट दिले असून त्यापोटी या कंपनीला एस.टी. महामंडळाकडून दरमहा लाखो रूपये अदा केले जातात.वणी आगारात स्वच्छता ठेवण्यासाठी पाच ते सहा कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु स्वच्छतेची समस्या मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रसाधनृहात प्रचंड तुटफूट झाल्याने घाण तुंबत आहे. त्यामुळे कितीही स्वच्छता केली तरी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर गंभीर परिस्थिती असतानाही या स्वच्छतागृहांची दुरूस्ती करण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे वणी आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.कर्मचारी संघटनेची समस्येकडे डोळेझाककर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी संघटना कार्यरत आहे. मात्र वणी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृह व विश्रामगृहाची दुरावस्थेकडे कर्मचारी संघटनेचेदेखील डोळेझाक होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता संघटनेनेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :state transportएसटी