वणीतील पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:38+5:30

दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वणीत येऊन प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. वणी-वरोरा मार्गावरील साई दरबार व शांती पार्क भागात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्राला प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

Wani again two corona positive | वणीतील पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

वणीतील पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे१० जण निगेटिव्ह : उर्वरित अहवालांकडे लक्ष, पोलीस अधीक्षक वणीत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मुंबईहून वणी शहरात आलेल्या दोघांसह वणीतील एकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केलेल्या ५३ जणांपैकी पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रूग्णांची संख्या आता पाच झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. १० जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वणीत येऊन प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. वणी-वरोरा मार्गावरील साई दरबार व शांती पार्क भागात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्राला प्रतिबंधीत करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी या क्षेत्राची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
१२ जून रोजी मुंबईवरून एक कुटुंब वणीत आले होते. सर्वप्रथम त्या कुटुंबातील एका दाम्पत्याला तसेच या दाम्पत्याच्या नात्यातीलच वणीत राहणाºया एकाला कोरोना झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. यादरम्यान प्रशासनाने तातडीने हालचाली करून सदर व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांची माहिती घेऊन ५३ जणांना परसोडा येथील कोव्हिड सेंटरमध्ये क्वारंटाईन केले. यातील पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता रूग्णांची संख्या पाच झाली आहे, अशी माहिती वणीचे एसडीओ शरद जावळे यांनी दिली. सुरूवातीला १५ जणांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १० जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Wani again two corona positive