शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या नऊ दिवसात ‘वेटींग’ आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

वाढोणाबाजार आणि खैरी येथे सीसीआयला या काळात समाधानकारक प्रतिसाद आहे. राळेगावला त्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. राळेगाव व वाढोणाबाजार येथे सुरू असलेेले खासगी खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना नगदी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी खासगीकडे वळले. दिवाळीपूर्वी सीसीआयच्या कापूस खरेदीची शेतकरी प्रतीक्षा करीत हाेते. पण आता दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्रीस त्यांनी ब्रेक दिला असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देराळेगावात सीसीआयची कापूस खरेदी; वाढोणा, खैरीत प्रतिसाद

    लाेकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने राळेगाव केंद्रावर आठ हजार ६३८, वाढोणाबाजार केंद्रावर तीन हजार ५४६, खैरी केंद्रावर चार हजार ९६१ याप्रमाणे २५ हजार नऊ शेतकऱ्यांची नोंदणी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता केली होती. १६ नोव्हेंबर रोजी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली. अवघ्या नऊ दिवसात या सर्व शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता आणण्याचे संदेश गेले. या नऊ दिवसात २५ हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी विकला.वाढोणाबाजार आणि खैरी येथे सीसीआयला या काळात समाधानकारक प्रतिसाद आहे. राळेगावला त्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. राळेगाव व वाढोणाबाजार येथे सुरू असलेेले खासगी खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना नगदी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी खासगीकडे वळले. दिवाळीपूर्वी सीसीआयच्या कापूस खरेदीची शेतकरी प्रतीक्षा करीत हाेते. पण आता दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्रीस त्यांनी ब्रेक दिला असल्याचे सांगितले जाते. 

शेतकऱ्यांची द्विधा मानसिकताशेतकरी एकीकडे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री करण्यास थांबले आहेत, तर दुसरीकडे खासगीत पाच हजार ५०० रुपयांच्या जवळपास दरात आपला कापूस विकून मोकळे होत आहे. प्रती क्विंटल सरासरी ३०० रुपये क्विंटलप्रमाणे प्रत्येक गाडीवर पाच-सहा हजार रुपयांचे नुकसान करून घेत असल्याने त्यांच्यातील द्विधा मानसिकता दिसून येते. खासगीतही अनेक शेतकरी दुसऱ्या आठवड्यात पैशाचा चुकारा नेत असताना ते स्वत:चे नुकसान का करून घेत आहे, हा प्रश्नच आहे. हंगाम सुरू हाेवून महिनाभर तर सीसीआयला १५ दिवस झालेत. प्रत्येक केंद्रावर दररोज ५० ते ७५ हजार वाहने खासगी व सीसीआयकरिता येत आहे. अत्यल्प आवक अस्वस्थ  करणारी आहे.

सीसीआयकडून पाच हजार ८२५ रुपये दर दिला जातो. चुकारेही पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. सीसीआयची कापूस खरेदी आता सर्वांकरिता पूर्णत: खुली झाली आहे. - उमेश डाबेराव, खरेदी प्रतिनिधी, सीसीआय, राळेगाव

 

टॅग्स :cottonकापूस