शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचे मतदार नेत्यांच्या ‘मध्यस्थी’ने त्रस्त

By admin | Updated: November 17, 2016 01:23 IST

विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने

उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही : ४८ सदस्यांची ‘वजन’ वाढविण्यासाठी कळंबमध्ये बैठक यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने मतदारांना ‘कोण-किती’ याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या मध्यस्थांमुळेच मतदार त्रस्त आहेत.विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना मतदारांमधील अस्वस्थता उफाळून आली आहे. कारण आपल्या नावावर मध्यस्थाची भूमिका वठविणारे नेते तर ‘दुकानदारी’ करणार नाही ना अशी हूरहूर या मतदारांना आहे. उमेदवार अद्यापही मध्यस्थांमध्येच गुरफटलेले आहेत. एवढेच नव्हे तर हे मध्यस्थ उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहचण्यात अप्रत्यक्ष अडथळे निर्माण करीत असल्याची माहिती आहे. उमेदवारांनी थेट आमच्याकडे ‘अ‍ॅप्रोच’ व्हावे, मध्यस्थ-नेत्यांना ‘किंमत’ देण्याची गरज नाही, असा मतदारांमधील सूर आहे. सर्व काही अंधारात आणि थर्ड पार्टी होत असल्याने मतदारांमध्ये उमेदवारांप्रती नाराजी वाढते आहे. अशाच नाराजीतून भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादीतील ४८ सदस्य मंगळवारी एकत्र आले. त्यांची कळंबमध्ये गुप्त बैठक झाली. अपक्षाने काही दिवसांपूर्वी घाटंजीमध्ये मतदारांना आठ बोटे दाखविली होती. ते पाहून शिवसेनेने दोनही पंजे मतदारांपुढे उघड केले. मात्र प्रत्यक्षात सध्या टोकन म्हणून अवघी दोन ते तीन बोटे फिरविली जात असल्याने मतदार संभ्रमात सापडले आहेत. उमेदवारांनी बोलल्याप्रमाणे ‘वजन’ वाढवावे म्हणून दबाव निर्माण करण्याचे कळंबच्या बैठकीत ठरले. जिल्ह्यात विधान परिषदेच्या मतदारांचे तीन गट पडल्याचे चित्र आहे. एक काँग्रेसकडे, दुसरा सेनेकडे तर तिसरा गट ऐनवेळी निर्णय घेऊ अशा भूमिकेत आहे. बाहेरचा उमेदवार काय करणार असा या तिसऱ्या गटाचा सवाल आहे. वास्तविक सेनेच्या पहिल्यांदाच यवतमाळ पाहणाऱ्या उमेदवाराने भविष्यात यवतमाळच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या काय योजना आहेत, याचा कधीही व कुठेही उहापोह केलेला नाही. त्यामुळे यवतमाळची जनता आणि विशेषत: मतदार शिवसेनेच्या या उमेदवाराबाबत संभ्रमात दिसत आहे. हे उमेदवार भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने जनतेला किंवा माध्यमांनाही सविस्तर सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळेच हा संभ्रम वाढला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)