शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रेती लिलावासाठी २०० घाटांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

पर्यावरणाला धोका पोहचू नये, भूजलावरही विपरित परिणाम होऊ नये, यासह शासकीय मालमत्तेची हानी टाळता यावी याकरिता जलधोरण तयार करण्यात आले. या जलधोरणात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे घरकुल बांधणे आणि शासकीय योजनांसाठी रेती राखीव ठेवणे यासोबत घराच्या बांधकामाकरिता रेतीघाट आरक्षित केले जाणार आहे.

ठळक मुद्देनवीन जलधोरणानुसार होणार लिलाव : घरकूल, गृहनिर्माणासाठी राखीव ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन जलधोरणानुसार रेतीघाटांचा लिलाव केला जाणार असून अंंमलबजावणीचे निकष जाहीर करण्यात आले. त्यानुसार तालुकास्तरीय संनियंत्रण समितीला प्रथम घाटांची पाहणी करावी लागणार आहे. यानंतर विविध बाबींसाठी रेतीघाट आरक्षित ठेवले जाणार आहे. अशा २०० रेतीघाटांची पाहणी समितीने केली आहे. यातील योग्य घाटांसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहे.पर्यावरणाला धोका पोहचू नये, भूजलावरही विपरित परिणाम होऊ नये, यासह शासकीय मालमत्तेची हानी टाळता यावी याकरिता जलधोरण तयार करण्यात आले. या जलधोरणात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे घरकुल बांधणे आणि शासकीय योजनांसाठी रेती राखीव ठेवणे यासोबत घराच्या बांधकामाकरिता रेतीघाट आरक्षित केले जाणार आहे. याशिवाय खनिकर्म विभागाच्या लिलावाकरिता रेतीघाटांची निवड करणे इत्यादी बाबींवर जलधोरणात विचार करण्यात आला आहे. त्याचे पालन करण्याचे आदेश खनिकर्म विभागाला जिल्हा समितीने बजावले आहे.रेतीघाटाच्या प्रत्यक्ष लिलावापूर्वी तालुकास्तरीय संनियंत्रण समिती रेतीघाटांची पाहणी करणार आहे. अध्यक्षस्थानी तहसीलदार, जलसंपदा विभागाचे अभियंता, दोन कनिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे प्रतिनिधी या समितीमध्ये असणार आहे. तालुका संनियंत्रण समितीने आतापर्यंत २०० रेतीघाटांच्या साठ्यांची पाहणी केली. यातून लिलावास योग रेतीघाट वेगळे काढले जाणार आहे. या रेतीघाटासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागविले जाणार आहे. विशेष म्हणजे, रेतीघाटाचा जिल्हास्तरीय मास्टर प्लान खनिकर्म विभागाला तयार करावा लागणार आहे. मान्यताप्राप्त सल्लागारामार्फत हा प्लान तयार करावा लागणार आहे. हरित लवादाचे वेळोवेळी येणारे नियम रेतीघाटांना पाळावे लागणार आहेत.लिलाव लांबल्याने चोरट्यांचा धुमाकूळनवीन जलधोरणानुसार रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्याकरिता विलंब लागल्याने रेतीघाट तस्करांनी या ठिकाणावरून रेती चोरण्यास सुरूवात केली आहे. याचा फटका शासनाच्या तिजोरीला बसत आहे. यावर मात करण्यासाठी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तरच गौण खनिजाची चोरी थांबणार आहे.

टॅग्स :sandवाळू