शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

घारफळ परिसरातील गावे वादळी पावसाच्या तडाख्यात

By admin | Updated: March 1, 2016 02:05 IST

सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात..

तुरळक गारा : रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान, वीजपुरवठा खंडितघारफळ : सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात झाल्या. गहू, हरभरा, कापूस यासह भाजीपाला पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा मार झेलत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. यानंतर पाऊस आणि गारा पडल्या. पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक उद्ध्वस्त झाले आहेत. घारफळ, परसोडी, सारफळी, एरंडगाव, गोंधळी, वडगाव, मुबारकपूर, गवंडी, खर्डा, सिंदी, वरूड, रेणुकापूर, पाचखेड, आष्टा, सौजना या गावांमधील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. वीरखेड, वाटखेड या गावांमध्ये सतत दोन दिवस वादळी पाऊस आणि गारपीट झाली. पावसाच्या कमी प्रमाणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खरिपाचे उत्पादन बुडाले. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रबी पिकांसह कपाशीला पाणी देवून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु अचानक झालेल्या पावसामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पूर्णत: पाणी फेरले गेले आहे. संबंधित विभागाने पिकाच्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी आहे.पाऊस आणि गारांमुळे परिसरातील वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांधलेल्या विटांचा चिखल झाला, तर लावलेली भट्टी विझली. आता वीटभट्टी मालकांना यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. परिणामी विजेवर चालणारे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. (वार्ताहर)