शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गावे १२५, ग्रामसेवक ५६

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक

उमरखेड (कुपटी) : ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक ग्रामसेवक शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे विकासाचे तीन-तेरा वाजले असून अनेक गावात महिनोंमहिने ग्रामसेवकाचे दर्शनच होत नाही. ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहोचविणे आणि जनतेच्या समस्या दूर करणे ही महत्वाची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. मात्र उमरखेड तालुक्यात आता ग्रामसेवकच समस्या होऊ पाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यात अनेक गावात ग्रामसेवकांचे दर्शनच होत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना माहीत होत नाही. उलट मजुरी पाडून शहराच्या ठिकाणी ग्रामसेवकाला शोधावे लागते. अनेक ग्रामसेवक १५ दिवसांपासून किंवा आठवड्यातून एकदा आपल्या कर्तव्याच्या गावी दिसतात. उर्वरित सहा दिवस घरी आराम करतात. पंचायत समितीचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रकार बंद झाला नाही. त्यामुळे आता नागरिकांनी तक्रारी करणेही सोडून दिले आहे. एखाद्या गावात गैरप्रकार उघडकीस आल्यास संबंधित ग्रामसेवक वरिष्ठांच्या संगनमताने त्वरित ग्रामपंचायत बदलून घेतो. या प्रकाराला आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याला आधीच चहा-पाणी झालेले असते. ग्रामीण भागातील विकासाला बळकटी देणारी संस्था असली तरी सध्या ग्रामसेवकच दिसत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. अनेक गावात साथीचे आजार पसरले आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. गावाच्या स्वच्छतेकडेही ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. कुणी विचारणा केली तर आम्ही करणार तरी काय आमच्याकडे तीन-तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याचे सांगतात. काही ग्रामसेवकांवर कामाचा बोझा असला तरी इतर ग्रामसेवक मात्र तीनही गावातील नागरिकांना वेगवेगळी कारणे सांगतात आणि सदर ग्रामसेवक तीनही गावाऐवजी घरीच आराम करीत असतो. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)