शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात जणू अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. किराणा, फळे किंवा भाजीपाला बाजारातच गर्दी होती असे नव्हे तर सर्वच प्रकारच्या दुकानांपुढे गर्दी दिसून आली.

ठळक मुद्देसर्वत्र गर्दीच गर्दी : आजपासून सात दिवस लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शनिवार २५ जुलैपासून पुढील सात दिवस ३१ जुलैपर्यंत यवतमाळ शहरात संपूर्ण लॉकडाऊन आहे. परंतु त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी यवतमाळात सर्वत्र जणू अनलॉकची स्थिती पहायला मिळाली. प्रत्येक रस्त्यावर गर्दी-गर्दी आणि गर्दी एवढेच काय ते चित्र दिसत होते.शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. किराणा, फळे किंवा भाजीपाला बाजारातच गर्दी होती असे नव्हे तर सर्वच प्रकारच्या दुकानांपुढे गर्दी दिसून आली. बहुतांश मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कोंडीचे कित्येकांनी आश्चर्य म्हणून फोटो-व्हीडीओही घेतले. आज गर्दीने बहरलेले रस्ते शनिवारपासून मात्र पुढील सात दिवस ओस पडणार आहे. या काळात फिरण्याची परवानगी नाही तरीही पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी पहायला मिळाली. कित्येकांनी दुचाकी वाहनांमध्ये चक्क ५०० ते ७०० रुपयांचे पेट्रोल भरुन घेतले.पूर्णत: लॉकडाऊनमध्ये सकाळी दूध विक्री केंद्र तर सायंकाळी एक तास फिरुन दूध विकण्याला परवानगी राहणार आहे. भाजी, फळ विक्रेत्यांना नगर-कॉलण्यांमध्ये सकाळी विक्रीसाठी फिरता येणार आहे. दवाखाने, औषधी दुकानांना २४ तासांची परवानगी आहे. आता सात दिवस पोलीस रस्त्यावर दिसणार आहे.पोलिसांचीही दाणादाणसात दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी यवतमाळ शहरात प्रचंड गर्दी उसळल्याने ती निवळताना पोलीस यंत्रणेचीही चांगलीच दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पोलिसांचे वाहनच गर्दीत बराचवेळ फसून राहिल्याचाही अनुभव आला. अखेर शहर ठाणेदार धनंजय सायरे यांना स्वत: वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरावे लागले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार