भोसा परिसरात अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:47+5:30

लॉकडाऊन असलेल्या प्रतिबंधित भागात सहसा कुणी फिरकण्यास तयार होत नाही. भोसा परिसरातील मंगेशनगर व इतर परिसरातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा परिसर पूर्णत: सील केला. आता या भागात गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी, डॉक्टर सेवा बजावत आहेत.

Unique welcome to the Corona Warriors who rendered uninterrupted service in the Bhosa area | भोसा परिसरात अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे अनोखे स्वागत

भोसा परिसरात अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे अनोखे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील भोसा परिसर प्रभाग क्र.२० हा कोरोना प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी १०० टक्के लॉकडाऊनचे पालन व्हावे, इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी झटणाऱ्या पोलीस, आशा वर्कर, नगरपरिषद कर्मचारी, सफाई कर्मचारी, जीवन प्राधिकरणचे कर्मचारी, वीज कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचे नागरिकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले.
लॉकडाऊन असलेल्या प्रतिबंधित भागात सहसा कुणी फिरकण्यास तयार होत नाही. भोसा परिसरातील मंगेशनगर व इतर परिसरातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा परिसर पूर्णत: सील केला. आता या भागात गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी, डॉक्टर सेवा बजावत आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. हे करताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोशल डिस्टन्सिंग पाळले. अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर असणाऱ्या या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांचा हा प्रतिसाद पाहून अक्षरश: भारावून आले. या उपक्रमासाठी येथील नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती व आकाश ब्राह्मणे यांनी पुढाकार घेतला होता.

Web Title: Unique welcome to the Corona Warriors who rendered uninterrupted service in the Bhosa area