शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

अव्वाच्या सव्वा वीजबिलाच्या दोन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:01 IST

२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.

ठळक मुद्देमहावितरणची सारवासारव : यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसदमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. या बिलामध्ये विजेचे वाढीव युनिट दर लागून आले. यामुळे ग्राहकांना जबर शॉक बसला आहे. यवतमाळ, पांढरकवडा या दोन विभागातून दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुसदचा आकडा आणखी मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.या बिलामध्ये वीज कंपनीच्या वाढीव रिडींग युनिटचा समावेश आहे. याशिवाय सर्व युनिट एकत्र झाल्याने त्याचे बिल वाढून आले, असा आरोप करीत ग्राहकांनी वीज कंपनी कार्यालयावर गत आठ ते दहा दिवसांपासून गराडा घातला आहे. दररोज शेकडो तक्रारी वीज कंपनी कार्यालयाकडे येत आहे. जे बिल ५०० ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना आठ ते दहा हजारांच्या घरात मिळाले आहे.वीज बिलाच्या वाढीव दराने सर्वसामान्य ग्राहक चकित झाले आहे. यातून त्यांनी वीज कंपनी गाठत बिल दुरुस्त करण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. कंपनीने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेत कुठलेही बिल रिडींग पेक्षा जास्त नाही हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल कमी होणार नाही, मात्र बिलाचे एकूण मूल्य दोन हप्त्यात विभागून देण्याबाबत कंपनी तयार आहे. प्रत्यक्षात ग्राहकाने ही वीज वापरली नव्हती, असे म्हणत ग्राहकांनी आम्हाला वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप केला आहे.कोरोना काळात गर्दी नियंत्रित करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र वीज कंपनी कार्यालयात एक खिडकी योजनेने प्रचंड गर्दी वाढली आहे.यातून कोरोना सारखा आजार पसरण्याचाही धोका आहे. कंपनीने ग्राहकांना सुविधा मिळावी यासाठी तक्रार जाणून घेण्याच्या जादा खिडक्या उघडाव्या अशी मागणी ग्राहक करीत आहे. वीज कंपनी यावर काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज