शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

गंभीर म्हणजे शुक्रवारी सकाळी आढळलेले दोन्ही रुग्ण नेर शहरातील रहिवासी आहे. दोन दिवसापूर्वी नेरमधीलच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या अहवालानुसार नवे दोन रुग्ण हे नेरच्या पहिल्या रुग्णाचे नातेवाईक (आई आणि मुलगा) आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या २३ अहवालांपैकी २१ निगेटिव्ह आले. तर शुक्रवारी पुन्हा ५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमायलेकाचा समावेश : जिल्ह्याची रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोना विषाणूने आता जिल्ह्याला घातलेला विळखा करकचून आवळणे सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब निष्पन्न झाली. त्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८४ झाली असून आतापर्यंतच्या एकंदर रुग्णांचा आकडा ९६ वर पोहोचला आहे.गंभीर म्हणजे शुक्रवारी सकाळी आढळलेले दोन्ही रुग्ण नेर शहरातील रहिवासी आहे. दोन दिवसापूर्वी नेरमधीलच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या अहवालानुसार नवे दोन रुग्ण हे नेरच्या पहिल्या रुग्णाचे नातेवाईक (आई आणि मुलगा) आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या २३ अहवालांपैकी २१ निगेटिव्ह आले. तर शुक्रवारी पुन्हा ५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नेर शहरातील आणखी काही जणांचे नमुने पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शुक्रवारच्या अहवालांनी जिल्ह्याची, त्यातल्या त्यात नेर तालुक्याची चिंता वाढविली आहे.दिवसभरात ४६ अहवाल निगेटिव्हयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात सध्या १३९ व्यक्ती भरती आहे. त्यापैकी ५५ प्रिझमटीव्ह केसेस असल्याचे मेडिकल प्रशासनाने कळविले. शुक्रवारी दिवसभरात ४८ जणांचे अहवाल आले. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह तर ४६ निगेटिव्ह आहेत. सुरुवातीपासून आजवर यवतमाळातून १४२६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी १२७३ नमुन्यांचे अहवाल मिळाले. त्यातील ११७२ निगेटिव्ह आहेत. तर १५३ अहवालांची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोरोनाची भीती घालविण्यासाठी मेडिकल प्रशासनाने ‘कोविड-१९ मनोधैर्य’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त झाल्याने वेगवेगळे मानसिक परिणाम होत आहे. अस्वस्थता, चिंता, नैराश्य, भीती किंवा कोरोना फोबिया निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य समुपदेशन केंद्राचा सर्वांना लाभ घेता यावा, यासाठी ७५८८६८१६८८ हा हेल्पलाईन क्रमांक अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंग, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. आर.के. राठोड यांच्या मार्गदर्शनात मनोविकृतीशास्त्र विभागाने सुरू केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या