बांगरनगर खुनामागे क्षुल्लक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:09+5:30

सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. त्याला सनकीने फोन करून वाद मिटवायला बोलाविले. सायंकाळी सागर झालेला वाद मिटवून टाकण्याच्या उद्देशाने बांगरनगरातील साई किराणा समोर पोहोचला.

Trivial controversy over Bangarnagar murder | बांगरनगर खुनामागे क्षुल्लक वाद

बांगरनगर खुनामागे क्षुल्लक वाद

Next
ठळक मुद्देएकाला अटक : तिघे पसार, दुचाकीचा कट लागल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी सायंकाळी बांगरनगर येथे सागर भुते या तरुणाच्या झालेल्या खुनामागे दुचाकीचा लागलेला कट एवढे क्षुल्लक कारण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. क्षणिक रागातून उद्भवलेल्या भांडणात एका तरुणाचा बळी गेला.
सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. त्याला सनकीने फोन करून वाद मिटवायला बोलाविले. सायंकाळी सागर झालेला वाद मिटवून टाकण्याच्या उद्देशाने बांगरनगरातील साई किराणा समोर पोहोचला. तेथे सनकी उर्फ विवेक कांबळे (१९), पवन पाईकराव (२४) दोघे रा. वाघापूर झोपडपट्टी, आयुष पंचभाई, योगेश वाघ (२१) दोघे रा. बांगरनगर हे उपस्थित होते. वाद मिटविण्यासाठी आलेल्या सागरशी शाब्दीक बाचाबाची करीत सनकी व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्र व दगडांनी हल्ला चढविला. यात सागर गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. अक्षय पिलारे व रजत शर्मा या दोघांनी जखमी सागरला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती अक्षयने सागरची आई मनोरमा भुते यांना दिली. सागरची आई मनोरमा भुते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पवन पाईकराव याला अटक केली. तर इतर तीन आरोपी पसार झाले आहेत.

आरोपी पवन पोलीस दप्तरी कुख्यात
दुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या वादात थेट जीवघेणा हल्ला आरोपींनी केला. यावरून या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येते. त्यातील पवन पाईकराव हा पोलीस रेकॉर्डवर कुख्यात आरोपी असल्याची नोंद आहे.

Web Title: Trivial controversy over Bangarnagar murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून