शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:23 IST

गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ...

ठळक मुद्देमदन येरावार : कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, ४० हजार पदवीधर शेतकऱ्यांच्या बांधावर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून सहपालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, आत्माचे संचालक दत्तात्रय काळे, डॉ. प्रमोद यादगिरवार उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. आजपर्यंतच्या सर्व उणीवा दूर करण्यासाठी काम करीत आहे. तत्कालीन सरकारमधील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलेले पॅकेज आमच्या सरकारने पूर्ण केले. विजेचा बॅकलॉग पूर्ण करून नवीन केंद्र उभारले जात आहे. मुबलक पाणी आणि मुुबलक वीज असेल तर शेतकºयांची प्रगती थांबविता येणार नाही.त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीेज देण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. साडेसहा हजार शेततळे पूर्ण केले आहेत. पुढे शेततळे निर्माण केले जाणार आहे.सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करणे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी केले.सूत्रसंचलन कैलास राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी मानले.शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान मिळावे आणि ते समजावे म्हणून कृषी पदवी घेतलेले ४० हजार पदवीधर आणि विद्यार्थी शेतकºयांच्या बांधावर पोहचतील.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. त्यांना मार्गदर्शन करतील, असे सूतोवाच पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कृषी विद्यालयाला स्टाफ देण्याची कारवाई पूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.