घाटंजी येथे घरावर झाड कोसळले

By Admin | Updated: May 24, 2015 00:01 IST2015-05-24T00:01:56+5:302015-05-24T00:01:56+5:30

येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील कडूनिंबाचे मोठे झाड अचानक कोसळून घरावर पडले.

The tree collapsed at the house at Ghatanji | घाटंजी येथे घरावर झाड कोसळले

घाटंजी येथे घरावर झाड कोसळले

घाटंजी : येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील कडूनिंबाचे मोठे झाड अचानक कोसळून घरावर पडले. त्यामुळे घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात प्राणहानी टळली.
पोलीस ठाण्याच्या आवारात कडुनिंबाची काही मोठमोठी झाडे आहे. त्यातील एक झाड मुळातून सडल्याने शुक्रवारी रात्री कोसळून शेजारच्या एक-दोन घरावर पडले. अवाढव्य झाड पडल्याने मोठा आवाज झाला. वीज पुरवठा करणारा त्या घरांचा सर्विस वायरही तुटला. त्यामुळे तेथे अंधार पसरला.
झालेला मोठा आवाज आणि अंधार यामुळे तेथील लोक जागे झाले. पाहतात तर राजू तागडे, कुणाल तागडे यांच्या घरावर झाड कोसळले. त्यांच्या घराची भिंत पडली, टिनपत्रे वाकली. घरातील काही साहित्याचे नुकसान झाले. दोन सायकलीही झाडाखाली दबल्या गेल्या. राजू डहाके आणि विजय डहाके यांच्या घरालाही क्षती पोहोचली. सुदैवाने यात प्राणहानी टळली. झाड पडले त्या समोरच्या खोलीत कोणीही झोपलेले नव्हते.
झाडामुळे धोका होवू शकतो, अशी तोंडी तक्रार ठाणेदारांकडे नुकसानग्रस्त नागरिकांनी केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दैव बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप बचावलो, असे कुणाल तागडे यांनी सांगितले. झालेली नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The tree collapsed at the house at Ghatanji