शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत शेतीत बदल आवश्यक

By admin | Updated: August 30, 2015 02:15 IST

शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे,....

राजीव शेट्टी : अंबोडा येथे शेतकरी मेळावा, शेताची प्रत्यक्ष पाहणीमहागाव : शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजीव शेट्टी यांनी केले. अंबोडा येथील गजानन महाराज संस्थानच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘अमृत पॅर्टन’ पुस्तकाचे प्रकाशन खासदार शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले, पुर्वी शेतीसाठी आर्थिक उलाढालीचे केंद्र हे त्या-त्या गावच्या सोसायट्या होते. जिल्हा मध्यवर्ती बँका त्यासाठी कर्ज पुरवठा करीत होत्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीची बलस्थाने पांढरपेशांनी घेरली. शेतकऱ्यांच्या बँका असलेल्या संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांना सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात जावे लागत आहे. कधी बँका तर कधी सावकार शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढीस लागले. शासनाला शेतकरी आत्महत्येचे मुळ शोधण्यास बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांनी एकत्र लढा उभारण्याची गरज शेट्टी यांनी व्यक्त केली. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. पंडित चव्हाण, जगदीश नरवाडे, मनीष जाधव, प्रकाश कोपरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नागोराव कदम, प्रकाश इंगोले, अमृतराव देशमुख, डॉ. संदीप शिंदे, हनवंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, अविनाश पतंगराव, एम.डी. मिराशे, शंकरराव राजेगोरे, हरिभाऊ कुंडेकर, गुलाब शेतीच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई पारवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)