सकल जैन समाजाचा आज मूक मोर्चा

By Admin | Updated: August 24, 2015 00:13 IST2015-08-24T00:13:40+5:302015-08-24T00:13:40+5:30

जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेवर बंदी आणल्याच्या विरोधात ...

Today's Silent Front of the Gross Jain Society | सकल जैन समाजाचा आज मूक मोर्चा

सकल जैन समाजाचा आज मूक मोर्चा

‘संथारा’ बंदीला विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
यवतमाळ : जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेवर बंदी आणल्याच्या विरोधात यवतमाळात सकल जैन समाजाच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी मूक व शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून सकाळी ठिक ९.३० वाजता शांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. या मोर्चात जैनधर्मीय पुरुष, महिला, तरुण, तरुणी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पुरुषांनी पांढरा ड्रेस व महिलांनी चुनरीची साडी घालून सहभागी व्हावे तसेच जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्याचे आवाहनही सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Today's Silent Front of the Gross Jain Society