शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मांगुर्डा परिसरात वाघाची दहशत

By admin | Updated: January 17, 2015 23:07 IST

तालुकतील मांगुर्डा परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी वाघाने यादव ठेकाम यांच्या मालकीच्या दोन

पांढरकवडा : तालुकतील मांगुर्डा परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी वाघाने यादव ठेकाम यांच्या मालकीच्या दोन वासरांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्या हल्ल्यात एक वासरू गंभीर जखमी झाले. नंतर १३ जानेवारीला प्रभाकर चिंचाळकर यांच्या शेताजवळ जंगलात चरत असलेल्या वासरावर वाघाने झडप घातली. मात्र वासरू लगेच पळाल्याने गंभीर जखमी होण्याचे टळले. या परिसरात वाघाची दहशत पसरल्यामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे शेतातून सूर्य मावळाच्या आत बाहेर पडण्याचा प्रयत्न होत आहे. मांगुर्डा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून निसर्गरम्य वातावरण आहे. या जंगलात रोही, हरीण, रानडुक्कर आदी वन्यप्राणी आढळतात. जंगलात शिकार केल्यानंतर पाण्याची सोय म्हणून मुची तलावाला वाघाने आपले आश्रयस्थान बनविले आहे. मुची तलावाच्या आसपासचा परिसर डोंगरदऱ्यांनी व्याप्त आहे. हा परिसर वाघाच्या मुक्कामाला पोषक आहे. दोन दिवसांपूर्वी पट्टेदार वाघ मुची तलावालगतच्या पठारावर फिरत दिसल्याची चर्चा आहे. वाघाचा मुक्काम परिसरात असल्याने मांगुर्डा ते बोटोणी मार्गावरून ये-जा करणाऱ्या कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगलालगतचे शेतकरी व शेतमजूरही असुरक्षित आहे. सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)