केवळ धक्का लागला म्हणून तिघांनी केले गळ्यावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:00 AM2021-11-26T05:00:00+5:302021-11-26T05:00:31+5:30

ज्ञानेश्वर हरिदास ढाकणे (३१) रा. वंजारी फैल असे जखमी युवकाचे नाव आहे.  ज्ञानेश्वर हा शासकीय तंत्रनिकेतनसमाेर असलेल्या एका वाईन बारमध्ये गेला हाेता. तेथून परत येताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. यावरून दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर ज्ञानेश्वर धामणगाव राेड चाैफुलीवर खर्रा खाण्यासाठी थांबला. तेथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

The three of them stabbed him in the neck with a knife | केवळ धक्का लागला म्हणून तिघांनी केले गळ्यावर चाकूने वार

केवळ धक्का लागला म्हणून तिघांनी केले गळ्यावर चाकूने वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून अगदी क्षुल्लक कारणावरून थेट खुनाची घटना घडत आहे. मेडिकल परिसरात वैद्यकीय विद्यार्थ्याचा खून, आर्णी राेडवर वकिलावर लाेखंडी राॅडने हल्ला झाला. आता बुधवारी रात्री धामणगाव चाैफुलीवर धक्का लागला म्हणून दाेघांनी युवकाच्या गळ्यावर चाकूने दाेन वार केले. त्याने गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालय गाठले, तेथे वेळीच उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला. 
ज्ञानेश्वर हरिदास ढाकणे (३१) रा. वंजारी फैल असे जखमी युवकाचे नाव आहे.  ज्ञानेश्वर हा शासकीय तंत्रनिकेतनसमाेर असलेल्या एका वाईन बारमध्ये गेला हाेता. तेथून परत येताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. यावरून दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर ज्ञानेश्वर धामणगाव राेड चाैफुलीवर खर्रा खाण्यासाठी थांबला. तेथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. त्याच्या गळ्यावर दाेन्ही बाजूने चाकूने वार करून ते तिघेही पसार झाले. रक्ताच्या थाराेळ्यात असलेल्या ज्ञानेश्वरने स्वत:ला सावरत कसेबसे शासकीय रुग्णालय गाठले. तेथे त्याच्या मानेवर डाॅक्टरांनी उपचार केले. १८ टाके जखमेवर घालण्यात आले. 
उपचार घेतल्यानंतर गंभीर अवस्थेतच ज्ञानेश्वर ढाकणे शहर पाेलीस ठाण्यात पाेहाेचला. त्याच्या तक्रारीवरून आराेपी अतुल पुरी (३८), जगदीश मिसाळ (४०) व कांबळे  नामक युवक तिघेही रा. विसावा काॅलनी  यांच्या विराेधात कलम ३०७, २९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर शहर पाेलिसांनी  तत्काळ आराेपींचा शाेध घेणे सुरू केले. यातील जगदीश मिसाळ व अतुल पुरी या दाेघांना अटक केली. तिसऱ्या आराेपीच्या शाेध पाेलीस घेत आहेत.
या घटनेत दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भररस्त्यात वकिलावर प्राणघातक हल्ला करून पळालेला आरोपी अद्यापही मोकाट आहे. किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्याचे प्रकार वाढत असताना असे आरोपी मोकाट फिरणे नागरिकांच्या मनात दहशत वाढविणारे ठरत आहे. त्यामुळे बुधवारच्या घटनेतील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

 

Web Title: The three of them stabbed him in the neck with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.