शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारासह तीन मारेकरी गजाआड

By admin | Updated: May 25, 2014 23:54 IST

शिवसैनिक रामनारायण ऊर्फ दादू मिश्रा याच्या खूनात एका कंत्राटदारासह तीन मारेकर्‍यांना पोलिसांनी अटक केली. दादूचा खून हा तलवारीने नव्हे तर सत्तूरासारख्या शस्त्राने केल्याची कबुली या मारेकर्‍यांनी

शिवसैनिक खूनप्रकरण : सत्तूरसारख्या शस्त्राने खून केल्याची कबुली

यवतमाळ : शिवसैनिक रामनारायण ऊर्फ दादू मिश्रा याच्या खूनात एका कंत्राटदारासह तीन मारेकर्‍यांना पोलिसांनी अटक केली. दादूचा खून हा तलवारीने नव्हे तर सत्तूरासारख्या शस्त्राने केल्याची कबुली या मारेकर्‍यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यापुढे दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादातून शिवसैनिक दादू मिश्रा याचा उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. घटनेनंतर त्याची पत्नी सविता मिश्रा हिच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये संशयित विठ्ठल ढोणे, जगदीश दांडगे यांची नावे नमूद करण्यात आली होती. गोपनीय माहितीत पोलिसांच्यापुढे हीच नावे आली होती. त्यावरून पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, शनिवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास संशयित विठ्ठल ढोणे (३४) रा.संकटमोचन यवतमाळ हा जिल्हा परिषद कार्यालयासमोरून जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे शिपाई रामेश्‍वर भिसे आणि अमोल चौधरी यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून विठ्ठलला शिताफिने ताब्यात घेतले. तसेच वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन केले. विठ्ठलच्या अटकेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे फौजदार नरेश रणधीर ठाण्यात दाखल झाले. त्यांनी विठ्ठलची कसून चौकशी केली. त्यामध्ये कंत्राटदार विठ्ठलने दादू हा नेहमीच आपल्या कामात ढवळाढवळ करायचा. अनेकवेळा कामाच्या तक्रारीही केल्या. त्यामुळे संतापाच्या भरात त्याचा खून केल्याची कबुली विठ्ठलने पोलिसांपुढे दिली. तसेच घटनेत सहभागी असलेल्या तीन साथीदारांची नावेही उघड केली. त्यावरून एसडीपीओ मदने, फौजदार रणधीर, शिपाई गजानन धात्रक, इकबाल शेख यांच्या पथकाने त्याच्या साथीदारांचा शोध घेतला. त्यामध्ये जगदीश पुरुषोत्तम दांडगे (२२) रा.तंबाखे ले-आऊट आणि मारोती दामोधर अवसरे (३५) रा.संकटमोचन या दोघांनाही शिताफिने अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना रविवारी येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीदरम्यान तीनही मारेकर्‍यांकडून घटनेतील शस्त्र, त्यांचे रक्ताने माखलेले कपडे, पसार होण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात येणार आहे. तसेच दादू मिश्रा याचा खून कटातून तर झाला नाही ना, या मागे कुणी राजकीय सूत्रधार आहे का आदी बाबींचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय आनंद पिदूरकर यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)