शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर

By admin | Updated: October 10, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शेतकरी भडकले : यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरसोययवतमाळ : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सुसज्ज शेड असूनही बाजार समितीत विक्रीस आलेले तब्बल साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन उघड्यावरच पडून आहे. शुक्रवारी या समस्येमुळे शेतकरी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध भडकले होते.शेतकऱ्यांचे सोयाबीन निघणे सुरू झाले आहे. तसेच दसऱ्याचा सण तोंडावर असल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले जात आहे. हे सोयाबीन सामावून घेण्याची क्षमता यवतमाळ बाजार समितीमध्ये आहे. मात्र, नियोजन नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीत तीन सुसज्ज शेड आहेत. जवळपास १० हजार पोती ठेवण्याची क्षमता या शेडची आहे. तरीही साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन शुक्रवारी शेतकऱ्यांना उघड्यावरच ठेवावे लागले. यामागे बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.गुरुवारपर्यंत खरेदी केलेला माल शेडमध्येच ठेवण्यात आला आहे. या मालाचा ‘पाला’ (मिसळणे) वेळेत करण्यात आला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे. जवळपास १० हजार पोती उचललीच न गेल्याने नवीन आलेला माल शेडमध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यातच शुक्रवारी बाजार समितीत साधारण साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवाक झाली. मात्र शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवून खरेदीसाठी वाट पहावी लागली. या सोयाबीनची उघड्यवरच बोली लावली जात होती.विशेष म्हणजे, सोयाबीनची आवक वाढताच खरेदीदारांनी लगेच भावही पाडले. गुरुवारपेक्षा शुक्रवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुरुवारपर्यंत सोयाबीनला ३८०० ते ३९०० रुपये भाव होता. मात्र, शुक्रवारी आवक वाढताच हे भाव ३७०० रुपयांपर्यंत पाडण्यात आले. त्यामुळेही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरूवारच्याच भावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र बाजार समितीकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर म्हणाले की, पुढील तीन दिवस बाजार समितीला सुटी आहे. त्यामुळे माल खरेदी होणार नाही. शेडमधील माल आजच मार्गी लावला जाईल. परंतु, बाजार समितीत बाहेरचे व्यापारी फारच कमी प्रमाणात असल्याने स्पर्धा कमी आहे. त्याचा गैरफायदा घेत भाव पाडले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (शहर वार्ताहर)