शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील हजारोंचे साहित्य जळून खाक

By admin | Updated: May 31, 2015 02:18 IST

तालुक्यातील लोणी व पेंढारा या गावांमध्ये शेतातील काडीकचरा जाळणे महाग पडले.

नेर : तालुक्यातील लोणी व पेंढारा या गावांमध्ये शेतातील काडीकचरा जाळणे महाग पडले. यामध्ये इंजीन, शेणखताचे ढिगारे व २७० झाडे जळून खाक झाली. तालुक्यात दोन विविध घटनांमध्ये शेतात लावलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली. तालुक्यातील पेंढारा येथील गोविंदराव बेले यांनी याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रामकृष्ण कांबळे याने शेतातील केरकचरा पेटविला. कचरा पेटत गेल्याने बेले यांच्या शेतासह इतर सहा शेतकऱ्यांच्या शेतातील शेणखताचे ढिगारे या आगीत जळाले. तसेच इंजीन जळून ५० हजारांचे नुकसान झाले. दुसऱ्या एका अशाच प्रकारच्या घटनेत लोणी शिवारात अशाच प्रकारे कचरा पेटविण्यासाठी आग लावली असता रोहयो योजनेतून रस्त्याच्या बाजुलाला लवलेली २७० झाडे जळून खाक झाली. याप्रकरणी लोणीचे ग्रामसेवक विशाल कुटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उन्हाळ््याच्या दिवसांमध्ये आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच सध्या शेतांमध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. यामध्ये कचरा गोळा करून तो जाळल्या जातो. बऱ्याचदा हवेमुळे ही आग इतरत्र पसरते. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. ती न घेतल्या गेल्यामुळे नेर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतांमध्ये आगीच्या या घटना घडल्या. (तालुका प्रतिनिधी)