शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआणखी १५२ नमुने पाठविले : अहवालावर ठरणार यवतमाळच्या लॉकडाऊनचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या संशयावरून यवतमाळात दररोज नवनवे रुग्ण दाखल होत असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. यापूर्वी पाठविलेल्या ७८ पैकी ३१ नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे. आणखी तब्बल १५२ जणांचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून आहे. हे अहवाल निगेटीव्ह आल्यास यवतमाळचे लॉकडाऊन हटवायचे काय, कोणती दुकाने सुरू ठेवायची, त्याचा वेळ काय असावा याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे या १५२ अहवालांकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.आठ पॉझिटीव्ह रुग्णांचा वावर राहिलेल्या व पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरच सील केलेल्या भागात घरोघरी सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. टप्प्याटप्प्याने त्याची तपासणी केली जाणार आहे. त्या भागातील तब्बल ३० जणांना ताप असल्याची गंभीरबाब पुढे आली. प्रायोगिक तत्वावर त्यातील दहा जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या त्या आठ रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपचार केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजताजनधन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी तमाम बँकांसमोर जिल्हाभर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहेत. दुपारी १२ पर्यंत बँकांचे कामकाज चालेल. पैसे काढणे, टाकणे, ट्रान्सफर करणे आणि बॅलन्स तपासणे एवढीच कामे या काळात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी बँकांच्या सुधारित वेळांचा हा आदेश जारी केला. सध्या बँकांपुढे गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून आणि नागरिकांचा कडाक्याच्या उन्हातील तासन्तास बँकेपुढे उभे राहण्याचा त्रास वाचविण्यासाठी बँका आता सकाळी ८ वाजतापासूनच उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या