शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेसाठी साडे चार लाख मतदार

By admin | Updated: October 20, 2016 01:36 IST

नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे.

६२२ केंद्र : महिलांची संख्या पुरूषांच्या बरोबरीने, आॅनलाईन उमेदवारी अर्जाची सोययवतमाळ : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे. यात पुरुषांच्या बबरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. मतदानासाठी ६२२ केंद्र राहणार असून दोन हजार ४८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र पतापसिंग यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात यवतमाळसह वणी, पुसद, दिग्रस, घाटंजी, आर्णी, दारव्हा आणि उमरखेड नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या आठ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय निवडणूक आयोगातर्फे तीन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ६२२ केंद्राध्यक्षांसह दोन हजार ४८८ मतदान कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळात २९४, पुसद६५, घाटंजी २७, उमरखेड ४८, वणी ७५, दिग्रस ४२, दारव्हा ३६, तर आर्णीत ३५ मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध राहणार आहे. निवडणूक विभागातर्फे मतदारांना छायाचित्रासह त्यांचा मतदार क्रमांक, परिसर असलेली स्लीप देण्यात येईल, अशी माहिती सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. यवतमाळात सर्वाधिक दोन लाख ३३ हजार ४0५ मतदार असून पुसद ५५ हजार ७६९, घाटंजी १५ हजार ५४३, उमरखेड ३६ हजार ९३९, वणी ४५ हजार ९२३, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७२, तर आर्णीत २३ हजार ३९३ मतदार आहेत. एकूण पुरूष मतदारांची संख्या दोन लाख ३८ हजार ८३0 असून महिला मतदारांची संख्या दोन लाख ३0 हजार ८२२ आहे. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या केवळ आठ हजारांनी कमी आहे. उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी मदत केंद्र असेल. २७ नोव्हेंबरला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 पर्यंत मतदान होईल, दुसऱ्या दिवशी २८ नोव्हेंबरला सकाळी १0 वाजतापासून मतमोजणी होईल. आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महाजन, माहिती अधिकारी मंगेश वरकड, दिलीप कडासने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)