शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात वकिलाच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

अ‍ॅड. प्रीतेश कैलासचंद्र वर्मा हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी घरात असलेले तीन लोखंडी व एक लाकडी असे चार कपाट फोडले. त्यांनी मंगळसूत्र, दोन अंगठ्या, लॉकेट, कानातील लटका असे एकूण एक लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख चोरुन नेले.

ठळक मुद्देचार कपाट फोडले : दागिन्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरातील भवानी मंदिर परिसरात राहणाऱ्या वकिलाचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.अ‍ॅड. प्रीतेश कैलासचंद्र वर्मा हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी घरात असलेले तीन लोखंडी व एक लाकडी असे चार कपाट फोडले. त्यांनी मंगळसूत्र, दोन अंगठ्या, लॉकेट, कानातील लटका असे एकूण एक लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख चोरुन नेले. वर्मा कुटुंबीय सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. आत प्रवेश केला असता चोरी झाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती ठाणेदार अमोल मुडे यांना देण्यात आली. त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनलाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढला. घरापासून चार ठिकाणी चोरटे गेल्याचे श्वानाने दाखविले. येथील गांधी यांच्या घराच्या परिसरात श्वान घुटमळला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ठसे तज्ज्ञांनीही घरातील विविध वस्तूंवरचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला. थंडीचा कडाका असल्याने प्रत्येक जणच दारे खिडक्या बंद करून झोपतो. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बिनधास्तपणे वर्मा यांच्या घरी हात साफ केला. या गंभीर घटनेने राळेगाव शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.चोरट्यांची दहशत असल्याने आता रात्री घराबाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात अ‍ॅड. प्रीतेश वर्मा यांच्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरी