शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याने तणाव

By admin | Updated: November 29, 2015 03:08 IST

युवा सेनेच्या तालुका प्रमुखावर ठाणेदाराने त्यांच्या कॅबीनमध्ये रिव्हॉल्व्हर रोखल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.

आर्णीत चक्काजाम : युवा सेनेची तक्रारआर्णी : युवा सेनेच्या तालुका प्रमुखावर ठाणेदाराने त्यांच्या कॅबीनमध्ये रिव्हॉल्व्हर रोखल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, ठाणेदारावर कारवाई करावी, या मागणीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हे काही कामानिमित्त दुपारी १ वाजता पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांच्यासोबत युवा सेनेचे तालुका प्रमुख नीलेश मस्के हेसुद्धा होते. या ठिकाणी मस्के यांचा मित्र नीलेश आठवले (रा.देऊरवाडी बु.) याला एका प्रकरणात ठाणेदाराने बोलावले होते. शिक्षा म्हणून त्याला दोन्ही हात वर करून एक तासापासून उभे ठेवले होते. या प्रकाराचे चित्रीकरण नीलेश मस्के हे मोबाईलमध्ये करत असल्याचा संशय ठाणेदार संजय खंदाडे यांना आला. त्यांनी चित्रीकरणाला मनाई केली. यानंतर मस्के यांच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर लावली. शिवाय मारहाणही केली. हा सर्व गंभीर प्रकार शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांपर्यंत पोहोचला. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर घटनेचा निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनावर प्रवीण शिंदे, नगरसेवक प्रवीण मुनगिनवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी राठोड, राहुल लाभशेटवार, स्वप्नील झाडे, रमेश ठाकरे, उज्ज्वल मोरे, उत्तम राठोड, लिंगाजी मंगाम, निखिल खारोळ, नीलेश गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात ठाणेदार संजय खंदाडे म्हणाले, चित्रीकरणास मनाई केल्यानंतरही मस्के यांनी हा प्रकार सुरूच ठेवला. आपल्यावर करण्यात आलेला मारहाण आणि रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)