शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कापूस जिनिंगला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.

ठळक मुद्देपणनचे कापूस खरेदी केंद्र : शेतकऱ्यांची झाली प्रचंड धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील एमआयडीसीत पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र असलेल्या गायत्री जिनिंगमध्ये रविवारी दुपारी आग लागली. या आगीत गोदामात ठेऊन असलेली सरकी जळून खाक झाली. अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.गायत्री जिनिंगमध्ये पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. सध्या शेतकरी घरातील कापूस विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्रावर येत आहे. कापसाची खरेदी सुरू असतानाच अचानक जिनिंगमधील सरकीच्या गोदातून धूर निघू लागला. परिसरात वाहनांची व शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांची धावपळ सुरू झाली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. जिनिंगच्या परिसरात कापूस गाठी, कापूस मोठ्या प्रमाणात ठेऊन होता. जिनिंग सुरू असताना शॉर्टसर्किट अथवा ठिणगी उडाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीची घटना माहीत होताच लोहारा ठाणेदार सचिन लुले ताफ्यासह दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. वृत्तलिहिस्तोवर आगीवर बºयापैकी नियंत्रण मिळविता आले होते. प्रत्येक जण आग विझविण्यासाठी धडपड करीत होता.२२०० कापूस गाठी वाचल्याजिनिंग परिसरात २२०० कापूस गाठी ठेऊन होत्या. तर पणन महासंघाने खरेदी केलेला तीन हजार क्विन्टल कापूसही याच ठिकाणी ठेवण्यात आला होता. आग सरकीच्या गोदामापुरतीच नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. अन्यथा कापूस गाठी व तीन हजार क्विन्टल कापूस जळून खाक झाला असता.

टॅग्स :fireआग