जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:16+5:30

सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्यातील काही केंद्रांवर गर्दी कायम आहे. पंचनाम्यानंतर राहिलेला कापूस पणन महासंघ खरेदी करणार आहे.

Temporary closure of trading of cotton in the district | जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद

जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद

Next
ठळक मुद्देशेकडो वाहनांच्या रांगा : धुलीवंदनानंतरच केंद्र उघडण्याचे संकेत, व्यापाऱ्यांची होतेय चांदी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुल्या बाजारात कापसाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा पणनच्या केंद्राकडे वळल्या आहेत. या ठिकाणी कापूस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. परिणामी पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदी तूर्त बंद केली. आता धुळवडीनंतरच कापूस खरेदी सुरू होणार आहे.
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्यातील काही केंद्रांवर गर्दी कायम आहे. पंचनाम्यानंतर राहिलेला कापूस पणन महासंघ खरेदी करणार आहे. ही खरेदी तात्पूरती बंद आहे. पणनचे केंद्र तात्पूरते बंद होत आहेत. मात्र सीसीआयची खरेदी सुरू आहे. अशा स्थितीत व्यापाºयांनी पडलेल्या दरात कापूस लाटण्यासाठी सीसीआयने खरेदी बंद केल्याची अफवा पेरली.

शासकीय तूर खरेदीसाठी ३२ खासगी गोदामांची पाहणी
शासकीय गोदामामध्ये तूर ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. यामुळे खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता जिल्हा प्रशासनाने तूर खरेदी करण्यासाठी खासगी गोदाम भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३२ गोदामांची पाहणी केली. सध्या व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. राज्य शासनाने ५८०० रूपये क्विंटलचे दर जाहीर केले आहे. मात्र खुल्या बजारात ४८०० पर्यंतच दर मिळत आहे. शासनाच्या हमी केंद्रात तूर विकण्यासाठी शेतकरी तयार आहेत. नाफेडने तूर खरेदी करण्यासाठी शासकीय गोदामाची अट ठेवली आहे. शासकीय गोदामात जागाच नसल्याने नाफेडची खरेदी थांबली होती. अखेर खासगी गोदाम, खरेदी विक्री संघ आणि इतर ठिकाणी तूर खरेदीसाठी जागा रिक्त आहे काय याची विपणन अधिकारी अर्चना माळवे यांच्या नेतृत्वात चमूने पाहणी केली.

जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदीत सुसूत्रता यावी म्हणून केंद्र तात्पुरते बंद आहेत. पुन्हा खरेदी सुरू होईल.
- चक्रधर गोस्वामी, विभागीय व्यवस्थापक, पणन

येत्या दोन दिवसात तूर खरेदीचा प्रश्न सुटेल. शेतकºयांना खुल्या बाजारातील लुटीपासून संरक्षणही मिळेल.
- एम. देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी

Web Title: Temporary closure of trading of cotton in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.