शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओसह पाच कर्मचारी निलंबित

By admin | Updated: January 13, 2016 03:00 IST

तालुक्यातील सावळीसदोबा वन विभागातील अवैध सागवान वृक्षावरील हॅमर प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह पाच वन कर्मचारी निलंबित करण्यात आले.

सावळी वन विभाग : बोगस हॅमरप्रकरण भोवले आर्णी/सावळीसदोबा : तालुक्यातील सावळीसदोबा वन विभागातील अवैध सागवान वृक्षावरील हॅमर प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह पाच वन कर्मचारी निलंबित करण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी केली. सावळीचे वन परिक्षेत्र अधिकारी हनवारीलाल जाधव, अंजनखेडचे वनपाल बी.पी. राऊत, सावळीचे वनपाल बालाजी चव्हाण, सावळीचे वनमजूर आर.पी. बांगर आणि जी.एफ. खडसे असे निलंबित झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सावळी सदोबा परिसरातील माळेगाव, वरुड वन परिक्षेत्रात वन विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी सर्वे नंबरच्या सागवानावर हॅमर मारत असताना याच सोबत अवैध कटाईतील सागवानावरसुद्धा हॅमर मारल्याचे निदर्शनास आले होते. तसेच सावळी परिसरात आॅक्टोबर महिन्यात अवैध वृक्षतोड उघडकीस आली होती. तसेच उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी ११ आॅक्टोबर रोजी धाड टाकली होती. त्यावेळी २६ नग सागवान अवैधरीत्या आढळून आले होते. या सर्व प्रकाराची चौकशी केल्यावर दोषी आढळल्याने वन परिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल आणि दोन वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सावळीसदोबा परिसरात अवैध सागवान व्यवसाय जोरात सुरू असून लगतच्या मराठवाडा आणि आंध्रप्रदेशात कटाई केली जाते. या कारवाईने या परिसरातील अवैध वृक्षतोडीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)